Need any help? Contact Us

अर्मेनियन शिलामुद्रण (शिलालेखन)


शिलामुद्रण (शिलालेखन) हे मध्ययुगीन अर्मेनियाच्या इतिहासाचा एक महत्वाचा प्रमुख स्रोत आहे. त्यांचं महत्त्व स्विकारून अनेक अर्मेनियन विचारवंत/लेखक यांनी शिलामुद्रणाचा संदर्भ म्हणुन त्यांच्या ऐतिहासिक कामांमध्ये वापर केला आहे त्यापैकी काहीजण म्हणजे स्टिपानोस ओर्बेलयान (१३ वं शतक), झकारिया कानाकेर्तस्की (१७ वं शतक) तसंचं येस्सायी हासन – जलालीयान, अघ्वांक येथील चर्चचे प्रमुख (कॅथोलिको), यांनी १७१८ मध्ये, खातचेन (अर्तसाख) विभागातील शिलामुद्रणा विषयी खुप संग्रह केला होता आणि एक पुस्तक पण लिहिलं होत.  i१९ व्या शतकाच्या आरंभी चर्चप्रमुख नेर्सेस अश्तारागेत्सी यांच्या प्रोत्साहनामुळे शिलालेखांच्या संग्रहाला आणि नोंदकामाला खुप गती मिळाली. आणि तेव्हा पासून शिलालेखांचा प्रवास, वर्णन, त्यातुन मिळणारी माहिती हे प्रकाशित व्हायला लागलं. या संदर्भात अनेकांनी केलेलं अमुल्य काम आता सुद्धा शास्त्रीय दृष्ट्या मोलाचं आहे. विशेष नोंद घेण्यासारखं काम म्हणजे बिशप होवहान्नेस शाखातौनयांत्स, फादर नेर्सेस सार्कीसयान, सार्कीस जलालीयांत्स, बिशप मगार बार्खोतारयांत्स, आर्चबिशप आपेल मखीतारयांत्स, फादर लेवोन आलिशान आणि इतरांचं काम.

तरीही, व्यवस्थित करून घेण्याचा त्रास, संग्रहासाठी आधुनिक कार्यवाहीच्या पद्धती विकसित करणं आणि अर्मेनियन शिलालेखानाचं नोंदकाम यांची जबाबदारी  निकोलाओस मार आणि त्यांचे शिष्य होवसेप ओर्पेली याना देण्यात आली. ओर्पेली हे अनी येथील पुरातत्वीय उत्खननात सहभागी झाले होते, त्यात त्यांनी अनी नगरातील शिलालेखांच्या खजिन्यांचा संग्रह आणि नोंदकाम केलं नंतर त्याचा सारांश ‘अर्मेनियन लिथोग्राफी कॉर्प्स’ या पुस्तक मालिकेच्या पहिल्या आवृत्तीत समावेश केला गेला ज्याचं संपादन सेतराग बारखौतारयान यांनी केलं.ओर्पेली हे त्यांच्या पूर्वाधिकाऱ्यांचं अभियान पुढे चालवणार आणि त्याचा विस्तार करणार हे ठरलंच होतं, आणि त्याचंच पर्यवसान त्यांच्या द्वारे ‘अर्मेनियन लिथोग्राफी कॉर्प्स’ मालिकेच्या २ ऱ्या ते ५ व्या आवृत्त्यांच्या प्रकाशनात झालं (४ थ्या ते ५ व्या आवृत्त्यांचं प्रकाशन ते मरणासन्न असताना आणि त्यांच्या निधनानंतर झालं, आणि काही अजूनही अप्रकाशित आहेत.). सेतराग बारखौतारयान यांनी अर्मेनिया शासनाच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेच्या अर्मेनियन शिलामुद्रण विभाग जो १९५९ साली स्थापन झाला, त्याचं प्रमुख पद सांभाळलं. सध्या ह्या विभागाचे प्रमुख गागिक सर्गस्यान आहेत. आता पर्यंत ९ आवृत्त्यांचं प्रकाशन झालं आहे आणि अजून काही अप्रकाशित आहेत.

अर्मेनियन शिल्पकारी (आणि शिलालेखन) वेगवेगळ्या गटात खालीलप्रमाणे विभागली आहे:

अ - रचना, प्रमाणपत्र / प्रमाणीकरण

आ - देणगीदार / उपकारकर्ता

इ - कायदा / परवाना / अनुदान

ई – शिला-स्मारकं आणि खत्चकार (एक पाषाण ज्यावर कलात्मक क्रूस आणि त्याभोवती सुशोभित कोरीवकाम केलेलं असतं)

उ - थडग्यावरील दगड

ऊ – किरकोळ अहवाल / शिलालेख

 सर्वात उल्लेखनीय म्हणजे चर्चच्या भिंती, प्रवेशद्वार, खिडक्यांच्या वरचा भाग, आणि हो, हे सर्वात जास्त प्रचलित व धर्मादाय स्वरूपाचे (म्हणजे धन, भुमी, मनुष्यबळ किंवा इतर स्वरूपाच्या दानाचा वापर करून उभारलेले ) आहेत, त्याची कोनशिला या बाबतची विस्तृत माहिती (बांधकाम, कलाकुसर आणि धर्मादाय या संबंधीची) दर्शवते. या कलाकृती त्यांच्या प्रमाणबद्ध मिलाप आणि कुशल कोरीवकामामुळे वेगवेगळ्या ओळखता येतात. शिला-स्मारकं ही सहसा छोटी, आणि मुख्यतः खत्चकार आणि थडग्यावरील दगड या वर आढळतात. शिलालेखन सहसा संक्षिप्त नोंदींमध्ये संक्षिप्त आणि अंतर्गत (एखाद्या कलाकृतीच्या आत केलेलं लेखन) या स्वरूपात सुद्धा केलं गेलं आहे. या साठी वापरलेल्या कोरण्याच्या पद्धती वेगवेगळ्या होत्या, काही पद्धतींमध्ये दगडाला खोदून लेखन करायचे तर काहींमध्ये दगडाला उठाव देऊन, तर काहींमध्ये दगडाला बहिर्गोल बनवून तर काहींमध्ये दगडाला सुशोभित करून.


मुख्यपृष्ठ “अर्मेनिअन आर्ट” ग्रंथालय गॅलरी म्युरल भित्तीचित्र स्क्रिप्टोरियम आमच्या बद्दल प्रकल्प दूवे

© 2017 - ArmenianArt.org - कडे सर्व अधिकार

मुख्यपृष्ठ

“अर्मेनियन आर्ट”

ग्रंथालय

गॅलरी

म्युरल भित्तीचित्र

मठातील ग्रंथलेखनशाळा (स्क्रिप्टोरियम)

आमच्या बद्दल

दूवे

या वेबसाईटवरिल प्रतिमा, छायचित्रं, मजकुरा सहित सर्व सामुग्री ArmenianArt.org ला श्रेय देऊन वैयक्तीक, शैक्षणिक, माहितीपर वापरता यईल.