Need any help? Contact Us

     प्रकल्प


वेबसाईटचं अजून एक अभियान म्हणजे सांस्कृतिक आणि वैज्ञानिक प्रकल्पांचा प्रसार करणे आणि सादर करणे.

खालील प्रकल्प अस्तित्वात येवू शकतात जर संभाव्य दात्यांनी अनुदान दिलं, संबंधीत तज्ञ सहभागी झाले आणि खाली दिलेल्या संस्थांनी सहकार्य केलं तर:


सांस्कृतिक मंत्रालय अर्मेनिया गणतंत्र,

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा संरक्षण संस्था,

मेस्रोप माश्टोट्स प्राचीन हस्तलिखित संस्था,

अर्मेनिया राष्ट्रीय गॅलरी,

पुरातत्व आणि मानववंशशास्त्र संस्था (RA NAS),

म्युरल जीर्णोद्धाराचं अर्मेनियन शास्त्रीय अभ्यास केंद्र,

आणि आवश्यकते नुसार इतर संस्था .


संभाव्य प्रकल्पांची एक छोटी यादी खाली सादर केली आहे.

संबंधीत प्रकल्पांचं विवरण रसिक पुरस्कर्त्यांना देता येईल.

१. अर्मेनियन म्युरल वर्षपुस्तक/वार्षिक (अर्मेनिया)


अर्मेनियन म्युरल कला ही एक प्राचीन आणि अद्वीतीय कलाक्षेत्रातील कलांपैकी एक कला आहे जिचा अजून पूर्ण अभ्यास झालेला नाही. या कले संबंधी पुस्तकं किंवा लेख फारसे उपलब्ध नाहीत आणि जे उपलब्ध आहेत ते विशिष्ट स्मारकांनाच समर्पित आहेत. या कला प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी एक वर्षपुस्तक/वार्षिक  (१ – २ वर्ष) प्रकाशित करता येईल ज्यात कलात्मक, वर्णनात्मक, विश्लेषणात्मक, टिकात्मक लेख, वार्ता आणि म्यूरलचा जीर्णोद्धार आणि इतर कामाची नवीन माहिती यांचा अंतर्भाव असेल.


यासाठी यांचा सहयोग घेऊ शकतो.:


अर्मेनिया राष्ट्रीय गॅलरी,

मेस्रोप माश्टोट्स प्राचीन हस्तलिखित संस्था,

म्युरल जीर्णोद्धाराचं अर्मेनियन शास्त्रीय अभ्यास केंद्र,


समन्वयक: कारेन मातेवोसयान, पीएच. डी. (इतिहास)


२. अर्मेनिया आणि अर्मेनिया बाहेरील अर्मेनियन म्युरलचा विस्तृत डेटाबेस


अर्मेनियन म्युरलचा अपुर्ण अभ्यास आपल्याला त्यांची संख्या, चर्च किंवा इतर संरक्षित बांधकामाची ठिकाणं, त्यांचा निर्मिती काळ, इ. बाबत त्रोटक माहिती देतो. म्युरल कलेच्या स्मारकांची नोंद ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्मारक नोंदणी संस्था, पुरातत्व स्मारक दर्शिका यात केली असली तरी त्यात अर्मेनिया बाहेरील स्मारकांच्या बद्दल काहीही माहिती नाही. एक व्यापक डेटाबेस तयार करण्यासाठी अर्मेनियन म्युरलची विस्तृत माहिती संकलित केलीच पाहिजे. मान्यताप्राप्त तज्ञ आणि व्यावसायीकांचा एक गट बनवणं आवश्यक आहे ज्यांना कागदपत्रांच्या तपासणीच्याआंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त पद्धतीनुसार प्रत्येक म्युरलसाठी शास्तोक्त ओळख क्रमांक बनवणं, प्रत्येक म्युरलसाठी वापरलेलं तंत्र, ग्रंथसुची, जुनी आणि नवीन छायाचित्रं, जीर्णोद्धाराचं विवरण इत्यादी काम करण्यासाठी सहभागी करुन घेता येईल.


यासाठी यांचा सहयोग घेऊ शकतो.:

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा संरक्षण संस्था,

अर्मेनिया राष्ट्रीय गॅलरी,

म्युरल जीर्णोद्धाराचं अर्मेनियन शास्त्रीय अभ्यास केंद्र,

अर्मेनियन स्थापत्यकला संशोधन संस्था (RAA)


समन्वयक: हासमिक गिनोयान


३. अर्मेनिया आणि अर्मेनिया बाहेरील चर्चशी संबंधीत चिन्हांचा विस्तृत डेटाबेस


१७  ते १९ ही शतकं अर्मेनियन ललित कलांसाठी असामान्य होती, विशेषतः चर्चशी संबंधीत चिन्हांच्या बाबतीत, जेव्हा चित्रफलकातील (easel) रंगचित्रांची पहिल्यांदा ओळख करून दिली गेली आणि त्यांची निर्मिती होऊ लागली. बरीचशी कलाकामं चर्च मधील धर्माधिकार्यांसाठी भेट म्हणून बनवली जायची, आणि म्हणूनच त्यावर विविध घार्मिक कलाकुसर, विविध ख्रिस्ती संत असायचे, रंगचित्रांच्या खालच्या भागात जे लेखन काम असायचं त्यावर दात्याचं नाव, चर्चचं नाव आणि दिवस, आणि काही वेळा इतर विवरण असायचं. पवित्र एच्मीयाद्झिनच्या आणि अर्मेनिअन राष्ट्रीय गॅलरीच्या ताब्यातील रंगचित्रांचा प्रामुख्यानी अभ्यास होत आहे (तरी त्यांची वैयक्तिक यादी नाही आहे.) पण जी रंगचित्र अर्मेनिया बाहेर आहेत त्याचं संशोधन झालं नाही आहे (त्यांच्या बद्दल खुप कमी माहिती आहे). म्हणून असं सुचवलं आहे की अर्मेनियन धार्मिक कलांचा डेटाबेस बनवण्यात यावा ज्यात आधीच संशोधन झालेल्यांगोष्टींचा समावेश असेल. हा प्रकल्प वेगवेगळ्या भागात छोट्या स्तरावर राबवला जाऊ शकतो. उदा:


जेरुसलेम येथील अर्मेनियन चिन्ह,

व्हेनिस येथील अर्मेनियन चिन्ह,

व्हिएन्ना येथील अर्मेनियन चिन्ह,
कॉंस्टॅंटिनोपलच्या पात्रीआर्चेट आणि चर्च मधील अर्मेनियन चिन्ह,

इराण मधील अर्मेनियन चिन्ह,

लेबेनन आणि सिरीया मधील अर्मेनियन चिन्ह,

रशिया आणि युक्रेन मधील अर्मेनियन चिन्ह,

रोमानिया मधील अर्मेनियन चिन्ह,

जॉर्जिया मधील अर्मेनियन चिन्ह (चर्च आणि स्मारकं)  आणि अनेक.


हा प्रकल्प राबवण्यासाठी त्या त्या ठिकाणची स्थानिक मदत खुप योगदान देऊ शकेल.  जर हा प्रकल्प राबवला तर आपल्याकडे अर्मेनियन ललितकला आणि शिलालेखनाच्या आणि इतर कोरीव कामाच्या संशोधनाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कागदपत्रांचा सूचीबद्ध केलेला संकलित डेटाबेस प्रकाशित करायला उपलब्ध असेल.


यांच्या सहयोगानी,


मदर सी ऑफ होली एच्मीयाद्झिन (अर्मेनियातील सर्व चर्चचे मुख्य नियंत्रक चर्च),

अर्मेनिया राष्ट्रीय गॅलरी,

अर्मेनियन चर्चचे विविध स्तर


४. पश्चिम अर्मेनिया आणि किलिकिया मधील अर्मेनियन मठातील ग्रंथशाळा (१० वं ते १९ वं शतक,

नकाशे आणि माहितीचा डेटाबेस)


२०११-२०१२ मध्ये अर्मेनिया गणतंत्राच्या राज्य समितीनी मातेनाद्रानसाठी पुढाकार म्हणून एका प्रकल्पाला अनुदान दिलं होतं, त्याला ’१० व्या ते १५ व्या शतकातील पश्चिम अर्मेनिया आणि किलिकिया मधील अर्मेनियन मठातील ग्रंथशाळा’ असं म्हटलं जायचं. त्या प्रकल्पाची निष्पत्ती संबंधीत भागाचे नकाशे अर्मेनियन आणि इंग्लिश भाषेत करण्यात आणि या साहित्य केंद्रांत लिहिलेल्या हस्तलिखितांचा डेटाबेस तयार करण्यात झाली. (या साईट वरील नकाशे विभागातील नकाशा पहा.) आता हा प्रकल्प १५ व्या शतका पासून १९ व्या शतका पर्यंतचा अभ्यासाचा समावेश करून पुर्ण करायचा आहे, डेटाबेस परिपूर्ण  करण्यासाठी त्यात सध्या उपलब्ध असलेल्या संशोधनाचा समावेश करायचा आहे.


यांच्या सहयोगानी,


मेस्रोप माश्टोट्स प्राचीन हस्तलिखित संस्था,


समन्वयक: लुसीने तुमानयान


५. गलादझोर विद्यापीठ शोधण्यासाठी आणि उत्खननासाठी पुराणवस्तुसंशोधन मोहिमा


अर्मेनियन सांस्कृतिक इतिहासात शोधायचं राहुन गेलेलं पान म्हणजे गलादझोर विद्यापीठाच्या ठिकाणाचा शोध. भुतकाळात तज्ञांनी गलाद्झोर विद्यापीठ शोधण्याचं महत्त्व लक्षात आणून दिलं होतं आणि त्यासाठी अनेक सिद्धांत आणि प्रबंध मांडले गेले होते. पण त्यातील एकाही विश्वसनीय सिद्ध नाही झाला. दुसरीकडे तिग्रान मकरत्च्यान यांच्या ‘गलादझोर विद्यापीठाच्या ठिकाणाची गृहितकं’ या पुस्तकात एक नवीन सिद्धांत मांडला आहे तो सत्य माहितीवर सुद्धा  आधारलेला आहे. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे “अघपेर्त  वांक” किंवा गलाद्झोर हे “होरमोन वांक” च्या जवळ वायव्येकडील एका टेकडीवर होतं, पण होरमोन वांक गलाद्झोर विद्यापीठाच्या शाखे पैकी (Campus) एक शाखा होती. या सिद्धांता बद्दल अधिक माहिती साठी आमच्या साईटच्या पुस्तकांच्या विभागाला भेट द्या. जर पुरातत्व संशोधन आणि अभियानाला अनुदान मिळालं तर हे गृहीतक एकतर सिद्ध तरी होईल नाहीतर खोडलं जाईल.


यांच्या सहयोगानी,

सांस्कृतिक मंत्रालय अर्मेनिया गणतंत्र,

पुरातत्व आणि मानववंशशास्त्र संस्था (RA NAS),

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा संरक्षण संस्था,


समन्वयक: तिग्रान मकरत्च्यान


६. हावूत्स तार मठातील ११व्या शतकातील मुख्य चर्चच्या ठिकाण क्र. ९ च्या संशोधनासाठी पुराणवस्तुसंशोधन मोहीम


हावूत्स तार मठ गारनी आणि गेघार्द यांच्या मध्ये अझात नदीच्या तीरावर वसला आहे. हा मठ अर्मेनियामधील सर्वात प्राचीन आणि सर्वात प्रसिद्ध मठांपैकी एक आहे जो ११ व्या ते १४ व्या शतकात सांस्कृतिक शिखरावर पोचला होता. सध्या मठाचं मुख्य बांधकाम अर्धवट भग्नावस्थेत आहे. मठाच्या इतिहास आणि शिलालेखनाच्या एका शास्त्रीय संशोधनात पुरातत्ववेत्ते आणि शिलालेखनकार गागिक सर्गस्यान यांनी नोंदलं आहे की त्यांना सर्वात जुन्या चर्चची एक भिंत मिळाली आहे. नंतर काही वर्षांनी मातेनाद्रान मध्ये एक प्राथमिक स्वरूपाचं कागदपत्र सापडलं जे सांगतं की हे चर्च इसवीसन १००२ मध्ये राजपुत्र गेव्होर्ग, जो केघी गढीचा स्वामी होता त्यांनी बांधलं आहे. हे कागदपत्र असं सुद्धा सांगतं की हे चर्च मुख्य चर्च होतं आणि त्यात नऊ वेदी होत्या. अनेक समन्वयक तपासांनंतर चर्चची अचुक जागा शोधणं शक्य झालं. अधिक माहितीसाठी आमच्या साईट वरील पुस्तकांच्या विभागातील कारेन मातेवोस्यान यांच्या ‘हावूत्स तार’ या पुस्तकात जे येरेवान इथे २०१२ मध्ये प्रकाशित झालं आहे त्याच्या पान क्र. ४८ – ४९ वर पहा.  या भागाचं अन्वेषण केलं तर ११ व्या शतकातील उल्लेखनीय चर्च शोधून काढण्याची मिळेल.


यांच्या सहयोगानी:


सांस्कृतिक मंत्रालय अर्मेनिया गणतंत्र,

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा संरक्षण संस्था,

पुरातत्व आणि मानववंशशास्त्र संस्था (RA NAS),


समन्वयक: अर्सेन हारुतुनयान


७. अर्मेनियन स्मारकं, मठ आणि चर्च (अर्तसाख सहित) प्रकाशात आणण्यासाठी छोटे माहितीपट (७ ते १५ मिनिटांचे) बनवणं.


सर्वात प्रसिद्ध स्मारकं, मठ आणि चर्च यांवर अनेक चित्रपट केले आहेत. तरी सुद्धा त्यात सर्व गोष्टींचं अवलोकन केलेलं नाहीये. इंटरनेटमुळे आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा  व्यापक प्रमाणावर सर्व जगभर प्रसार करण्याची  एक अद्वीतीय संधी आहे. अर्मेनियन डिजीटल माध्यमांना समृद्ध करण्यासाठी व्यावसायीक स्तरावर नवीन चित्रपट/लघुपट बनवणं आवश्यक आहे.


यांच्या सहयोगानी,

“शोघागत” टीव्ही, अर्मेनिया


समन्वयक: कारेन मातेवोस्यान


मुख्यपृष्ठ “अर्मेनिअन आर्ट” ग्रंथालय गॅलरी म्युरल भित्तीचित्र स्क्रिप्टोरियम आमच्या बद्दल प्रकल्प दूवे

© 2017 - ArmenianArt.org - कडे सर्व अधिकार

मुख्यपृष्ठ

“अर्मेनियन आर्ट”

ग्रंथालय

गॅलरी

म्युरल भित्तीचित्र

मठातील ग्रंथलेखनशाळा (स्क्रिप्टोरियम)

आमच्या बद्दल

दूवे

या वेबसाईटवरिल प्रतिमा, छायचित्रं, मजकुरा सहित सर्व सामुग्री ArmenianArt.org ला श्रेय देऊन वैयक्तीक, शैक्षणिक, माहितीपर वापरता यईल.