Need any help? Contact Us

मठातील ग्रंथलेखनशाळा (स्क्रिप्टोरियम)
 अर्मेनिशास्त्रात (Armenology) हस्तलिखीतांचा त्यांच्या स्थाना प्रमाणे अभ्यास करण्याची परंपरा आहे, कारण त्या त्या ठिकाणच्या मठातील ग्रंथलेखनशाळेत केलेलं लेखन, सुरेखन, लघुरंगचित्र इ. सारखेपणा दाखवतात, जो इतर ठिकाणच्या मठातील ग्रंथलेखनशाळेतील कामापेक्षा भिन्न आहे. अर्मेनियाच्या अभ्यासा अंतर्गत अर्मेनियन मठातील ग्रंथलेखनशाळांचा अभ्यास करायची सुरुवात १९६० आणि १९७० च्या दशकात माश्टोट्स ग्रंथालयात (मातेनाद्रान) दिवंगत संचालक लेवोन खाचिकयान यांच्या पुढाकारानी विकसित केली गेली. १९७० च्या दशकात अर्ताशे मातेवोसयान यांनी ग्रंथालयाच्या प्रदर्शन सभागृहासाठी ऐतिहासिक अर्मेनियाचे (पुर्व आणि पश्चिम अर्मेनिया) दोन नकाशे उभारले होते ज्यात मठातील ग्रंथलेखनशाळा ज्या ठिकाणी होत्या त्या ठिकाणांची माहिती विशेष करून नोंदवली होती. आता या नोंदीं मधील माहिती पुरेशी नाही कारण ती खुप त्रोटक आहे आणि मागील काही दशकात बनवण्यात आलेल्या यादीतील माहिती यामध्ये अंतर्भुत नाही आहे.

  प्रत्येक ठिकाणच्या मठातील ग्रंथलेखनशाळेचा विस्तृत अभ्यासा बद्दल काय? आता पर्यंतचा अभ्यास फक्त अंशतः झालेला आहे (अभ्यासपुर्ण लेखन फक्त काहीच मठातील ग्रंथलेखनशाळांचचं झालं आहे, उदा. मेतझोप मठ, अनी, सेवान मठ, स्केव्रा(स्केव्राचं बायबल); इतर ठिकाणावर विस्तृतपणे संशोधन अजून झालं नाही आहे.). सध्या ग्रंथालयात (मातेनाद्रान) अभ्यासाच्या अनेक विशेष संकल्पना पुढे आणल्या जात आहेत. या संकल्पना अर्तसाख, वास्पुराकान, किलिकिय अर्मेनिया, हाघपात आणि सनाहीन येथील मठातील ग्रंथालयाला अर्पित केली आहेत.

   मठातील ग्रंथालयाच्या कल्पनेत हस्तलिखितं बनवण्याच्या ठिकाणांची दोन विभागात विभागणी करता येईल: लेखनस्थान आणि मठातील ग्रंथालय. लेखनस्थान म्हणजे कोणताही परिसर, गाव, लहान नगर, गढी किंवा गाव जिथे सुरेखनकार रहायचे (नियमानुसार ते चर्चमधील धर्मोपदेशक  असायचे)आणि त्यांना तिथेच हस्तलिखित लिहायचा आदेश यायचा आणि तिथेच हस्तलिखितांच्या प्रतीसुद्धा बनवल्या जायच्या. आणि मठातील ग्रंथालयं मठातून किंवा त्याच्या जवळून कारभार चालवायची. तिथे हस्तलिखीतांच्या प्रती बनवणं आणि त्या संबंधीत असलेली इतर कामं विविध तज्ञ करायचे. लेखक आणि लघू रंगचित्रकारांना चर्मपत्र आणि कागद बनवणारे, रंग आणि सुवर्णपत्र बनवणारे मदत करायचे. मठातील ग्रंथालयात सुरेखन कलेचं गुरू कडून शिष्याकडे हस्तांतरण केलं जायचं. सुरेखनाच्या अशा काही शाळा सुद्धा होत्या ज्यांच्या स्वतःच्या परंपरा होत्या.

  प्रत्येक मठातील ग्रंथशाळेत लिहिलेल्या हस्तलिखितांवर असलेला तळ-टिपांमध्ये चटकन लक्षात न येणारी माहिती आहे. या तळ-टिपा नुसत्या वैविध्यासाठीच उल्लेखनीय नाहीत तर त्या विश्वासार्ह सुद्धा आहेत कारण लेखकांनी स्वतः अनुभवलेली प्रत्यक्ष माहितीच या तळ-टिपांमध्ये नोंदली जायची.

मुख्यपृष्ठ “अर्मेनिअन आर्ट” ग्रंथालय गॅलरी म्युरल भित्तीचित्र स्क्रिप्टोरियम आमच्या बद्दल प्रकल्प दूवे

© 2017 - ArmenianArt.org - कडे सर्व अधिकार

मुख्यपृष्ठ

“अर्मेनियन आर्ट”

ग्रंथालय

गॅलरी

म्युरल भित्तीचित्र

मठातील ग्रंथलेखनशाळा (स्क्रिप्टोरियम)

आमच्या बद्दल

दूवे

या वेबसाईटवरिल प्रतिमा, छायचित्रं, मजकुरा सहित सर्व सामुग्री ArmenianArt.org ला श्रेय देऊन वैयक्तीक, शैक्षणिक, माहितीपर वापरता यईल.