Need any help? Contact Us

अर्मेनियन हस्तलिखितं



अर्मेनियन सांस्कृतिक वारशात मध्ययुगीन हस्तलिखितांना एक विशेष स्थान आहे. त्यात ऐतिहासिक, साहित्यिक, विविध मुल्याची माहिती असल्यामुळे ती केवळ आशयसंपन्नच नाहीत तर त्यांचे विषय, साहित्यिक लेखन शैली, सुक्ष्म कला, मध्ययुगीन खाझ स्वरलिपी (खाझ हा एक अर्मेनियन स्वरलीपीचा प्रकार आहे) यामुळे ती (हस्तलिखितं) कलेचा अविष्कार सुद्धा आहेत आणि साहित्यिक केंद्रांची स्थानं, हस्तलिखित कोणी बनवलं, कोणत्या दिवशी बनवलं आणि अशा प्रकारच्या बरीच विवरणं, समकालीन घटना या बद्दल अचूक माहिती देणारी कागदपत्र सुद्धा आहेत. त्यामुळे ती एक संपन्न संदर्भ ग्रंथासारखी आहेत आणि प्रत्येक हस्तलिखित हे अद्वीतीय सांस्कृतिक स्मारक आहे.

आतापर्यंत वेगवेगळ्या शतकात खुप परीक्षण होऊन आमच्याकडे ३०००० हस्तलिखितं आलेली आहेत. हस्तलिखितांचा सर्वात मोठा संग्रह येरेवान येथील मेस्रोप माश्टोट्स पुरातन हस्तलिखित संशोधन संस्था (मातेनाद्रान) इथे आहे. या संग्रहात सुमारे १३००० संपूर्ण नोंदी, आणि २००० पेक्षा जास्त तुटक नोंदी आहेत. व्हेनिस येथील मखीतारीस्त परिषदेच्या ताब्यात ४०००, तसंच जेरुसलेम येथील अर्मेनियन पात्रीआर्चेट (संत जेम्स मठ / पुज्य हागोप वांक) च्या ताब्यात ४००० आणि व्हिएन्ना येथील मखीतारीस्त परिषदेच्या ताब्यात सुमारे २००० नोंदी, पुज्य एच्मीयाद्झिनच्या ताब्यात १००० हस्तलिखितं, तसंच पवित्र अमेनापर्गीत्च वांक (इराण मधील नोर त्चुघा किंवा नवीन जोल्फा येथील अर्मेनियन मठ) मध्ये पण आहेत. अर्मेनियन हस्तलिखितं जगभरातील अनेक विश्वप्रसिद्ध संग्रहालयं आणि ग्रंथालयांच्या ताब्यात आहेत उदा. पॅरिस, लंडन, वॉशिंग्टन, सेंट पीटर्सबर्ग अणि इतर अनेक. १९१५ मध्ये, अर्मेनियन वंशविच्छेदाच्या काळात १०००० च्या वर हस्तलिखितं नष्ट केली गेली.

मुख्यपृष्ठ “अर्मेनिअन आर्ट” ग्रंथालय गॅलरी म्युरल भित्तीचित्र स्क्रिप्टोरियम आमच्या बद्दल प्रकल्प दूवे

© 2017 - ArmenianArt.org - कडे सर्व अधिकार

मुख्यपृष्ठ

“अर्मेनियन आर्ट”

ग्रंथालय

गॅलरी

म्युरल भित्तीचित्र

मठातील ग्रंथलेखनशाळा (स्क्रिप्टोरियम)

आमच्या बद्दल

दूवे

या वेबसाईटवरिल प्रतिमा, छायचित्रं, मजकुरा सहित सर्व सामुग्री ArmenianArt.org ला श्रेय देऊन वैयक्तीक, शैक्षणिक, माहितीपर वापरता यईल.