अर्मेनिअन पुरालेखनशास्त्र हे एक वेगळ शास्त्र आहे ज्यात अर्मेनियन लेखन वारशाचं (अर्मेनियन अक्षरं वापरलेला, माश्टोट्स अक्षरं किंवा वर्णमाला जी ५ व्या शतकात उदयाला आली त्याचं) संशोधन आणि अभ्यास केला जातो. अर्मेनिअन पुरालेखनशास्त्रात अक्षरांचं परीक्षण, त्यांची वापराला सुरुवात झाल्यापासून उत्क्रांती, तसंच त्याचा अनेक प्रकारचा वापर, गुढलेखनासाठी वापर, परभाषेमधून लिप्यंतरण, अनेक पंचांग गणन (कॅलेंडर गणना), बीजगणितीय वापर आणि इतर उद्देशानी केलेला वापर यांचा समावेश होतो. अर्मेनियन पुरालेखनशास्त्र हे हस्तलिखीतं, शिलामुद्रण आणि मुद्रित साहित्यात वापरलेल्या अक्षरांचा अभ्यास करताना थेट वापरलं जातं.
१९ व्या शतकाच्या अखेरीस अर्मेनियन पुरालेखनशास्त्रात आवड वाढल्याचं नोंदलं गेलं आहे. व्हिएन्ना येथील मखीतारीस्त अर्मेनियन ब्रदरहुडचे फादर एच. ताशयान यांचा यामध्ये मोठा पुढाकार होता, त्यांनी १८९८ मध्ये, त्यांचं एक संशोधन पर पुस्तक मुद्रित केलं ज्याचं नाव «Ակնարկ մը հայ հնագրութեան վրայ»[अकनार्क म हाय हनाग्रुतयान वराय] [अर्मेनियन पुरालेखनशास्त्रावर एक दृष्टीक्षेप] असं होतं. ह्या पुस्तकात त्यांच्या काळात असलेल्या अर्मेनियन पुरालेखनशास्त्राबद्दलच्या प्रश्नांचा आणि मतांचा सारांश होता. हे इथे नोंदलंच पाहिजे की या लेखकाला हे पुस्तक लिहायचा प्रेरणा स्रोत एक अर्मेनियन अक्षरातील भूर्जपत्राचा अवशेष होता ज्यावर ग्रीक मजकूर सुद्धा होता (त्या बद्दल आम्ही नंतरच्या लेखांमध्ये माहिती देवू).
अनेक जणांनी अर्मेनियन पुरालेखनशास्त्राच्या कार्यक्षेत्रात योगदान दिलं आहे, त्यापैकी काही जणं म्हणजे घ. इंद्जीज्यान, घ. आलिशान, एन. अदोंत्स, एच. अचार्यान, के. होवसेपयान, एन. एकीनयान, के. घाफादारयान, ए. अब्राहमयान, ए. मातेवोस्यान आणि इतर.
एम. स्टोन, डी. कौयामीजान आणि एच. लेहमन द्वारे लिखित संशोधनात्मक प्रबंध “अर्मेनियन पुरालेखनशास्त्राचा अल्बम” ” («Հայ հնագրության ալբոմ» [Hay hnagrut̒yan albom]) जो २००२ मध्ये प्रकाशित केला होता त्याचं सुद्धा या क्षेत्रात मोठं योगदान आहे. पण हा प्रबंध अर्मेनियन मध्ये २००६ ला भाषांतरित झाला.