Need any help? Contact Us

अर्मेनियन म्युरल कलेचा अभ्यास, जतन आणि जीर्णोद्धाराचा प्रश्न. ही आहे अर्मेनियन म्युरल कलेच्या संशोधनाची सद्यस्थिती.

आमच्या कडे काही साहित्य उपलब्ध आहे. हे लेख आणि पुस्तकं, स्वतंत्र आणि व्यक्तिगत संशोधकांनी त्यांच्या काही विशिष्ट म्युरलच्या संशोधनाच्या निष्कर्षावर लिहीलेली आहेत.

  खरं तर अर्मेनियात १९४०-५० च्या दशकात आणि १९८० च्या पूर्वार्धात म्युरलच्या प्रती बनवणं / त्यांची रेखाकृती बनवण्याचं काम झालं, आणि ह्या कामासाठी ‘नॅशनल गॅलरी ऑफ अर्मेनिया’ नी पुढाकार घेतला आणि कार्यवाही एका चमूनी केली ज्याचं नेतृत्व लिदिया दुर्नोवो यांनी केलं होतं, त्यावेळी म्युरलच्या प्रती बनवण्याचं आणि रेखांकानाचं काम लंपादवांक मठ, अरुज (७ वं शतक), दातेव, हाघबाद (१० वं शतक), कोपयर (१३ वं शतक) आणि इतर ठिकाणी केलं. दुसऱ्या चमूनी अख्तलाला जाऊन बऱ्याच म्युरलच्या प्रती बनवल्या. या व्यतिरिक्त अजून वेगळ्या म्युरलच्या प्रती/रेखांकनं सुद्धा ‘नॅशनल गॅलरी ऑफ अर्मेनिया’ मध्ये प्रदर्शित केलेल्या आहेत.  त्वरीत लक्ष द्यायची गोष्ट म्हणजे अर्मेनियन सांस्कृतिक वारश्यातील एक घटक असलेली ‘अर्मेनियन म्युरल कला’ नष्ट होण्या आधी तिचा अभ्यास आणि संशोधन करणं आणि जतन करणं ही आहे.

यासाठी टाकायच्या अनेक पावलांमधील एक म्हणजे आपल्याला दोन दिशांनी त्वरीत आणि योजनाबद्ध रितीनी हालचाल केली पाहिजे, १) शास्त्रोक्त पद्धतीनी संशोधन आणि २) जतन.

  शास्त्रोक्त संशोधनाची सुरुवात एका एकत्रित यादीनी आणि डेटाबेसनी झाली पाहिजे, ज्यामध्ये प्रत्येक स्मारकाची वेगळी नोंद असेल. या नोंदीत त्या स्मारकाचा इतिहास, शैली, निर्माणाचा काळ, वर्णन, विश्लेषण, लेखन, सुधारणा, जीर्णोद्धार, रेखाचित्र, वापरलेलं रंगवण्याचं तंत्र,शास्त्रीय संदर्भ, त्याचे इतर ठिकाणी आलेले संदर्भ इ. ची पद्धतशीर माहिती असेल. यामुळे प्रत्येक म्युरलची एक सुचीबद्ध कागदपत्रं तयार होतील ज्यांना त्या म्युरलचा शास्त्रोक्त पारपत्र (पासपोर्ट) किंवा ओळखपत्र म्हणता येईल. या रूपरेषेनुसार अर्मेनियन म्युरलचा एक नकाशा बनवणं शक्य होईल. म्युरलना जतन करण्यात सध्या अस्तित्वात असलेल्या म्युरलच्या जीर्णोद्धाराचं काम अंतर्भूत असेल.

सध्या अस्तित्वात असलेल्या म्युरलच्या संशोधन आणि जतन करण्यासाठी रंगकामाच्या जीर्णोद्धारात पारंगत असलेल्या तज्ञांना सहभागी करून सुनियोजितपणे हे काम तडीस न्यायला लागेल.

  प्रत्येक म्युरलचं मुल्यमापन करून त्याच्या जीर्णोद्धारासाठी किती वेळ आणि खर्च होईल ते काढायला लागेल, तसंच ज्या म्युरलकडे तातडीनी लक्ष देणं आवश्यक आहे त्यांच्या जीर्णोद्धाराला अग्रक्रम दिला पाहिजे. आवश्यक निधी उपलब्ध झाला झाला की जीर्णोद्धाराचं काम लगेच सुरू करता येईल.


मुख्यपृष्ठ “अर्मेनिअन आर्ट” ग्रंथालय गॅलरी म्युरल भित्तीचित्र स्क्रिप्टोरियम आमच्या बद्दल प्रकल्प दूवे

© 2017 - ArmenianArt.org - कडे सर्व अधिकार

मुख्यपृष्ठ

“अर्मेनियन आर्ट”

ग्रंथालय

गॅलरी

म्युरल भित्तीचित्र

मठातील ग्रंथलेखनशाळा (स्क्रिप्टोरियम)

आमच्या बद्दल

दूवे

या वेबसाईटवरिल प्रतिमा, छायचित्रं, मजकुरा सहित सर्व सामुग्री ArmenianArt.org ला श्रेय देऊन वैयक्तीक, शैक्षणिक, माहितीपर वापरता यईल.