अर्मेनियन म्युरल
म्युरल/फ्रेस्को – हे अर्मेनियन ललितकलांच्या अद्वितीय आणि पुरातन अभिव्यक्तीं पैकी एक अभिव्यक्ती आहे जी अर्मेनियन वास्तुकलेचा अविभाज्य भाग आहे, तरीही दुर्लक्षित आहे. याचा ऱ्हास आणि क्वचित प्रसंगी पूर्णतः नष्ट व्हायला मानवी हस्तक्षेप, निसर्ग आणि वातावरण कारणीभूत आहे, ज्यामुळे ही नाजूक कला खुप प्रभावित झाली आहे. मध्ययुगीन अर्मेनियन म्युरल कला विशेष उल्लेखनीय आहे. आपल्याकडे याचे तुलनेनी खराब किंवा चांगल्या रितीनी जपलेले नमुने अर्मेनिया, ऐतिहासिक अर्मेनिया आणि जुन्या व नव्या अर्मेनियन विस्थापितांच्या प्रदेशात आहेत.
एक खुप जुनी आणि चुकीची समजूत आहे त्यात असा आरोप केला जातो की अर्मेनियन चर्चनी सध्या अस्तित्वात असलेल्या म्युरल मधील तत्वप्रणाली झिडकारली आणि ती काल्सेडॉन (बायझन्टाईन) आणि जॉर्जियन तत्वप्रणाली म्हणून घोषित केली. याच्या मुळे सुद्धा अर्मेनियन म्युरलच्या संशोधना बद्दल दुर्लक्ष झालं आहे. नंतर ही समजूत २० व्या शतकाच्या मध्यात, सिरारपी देर नेर्सेसयान (१८९६-१९८९) आणि लिदिया दुर्नोवो (१८८५-१९६३) यांनी केलेल्या प्रदीर्घ अभ्यास आणि संशोधनामुळे शास्त्रोक्त पणे नाकारली गेली. त्यांनी सादर केलेल्या पुराव्यात मुळ संदर्भ आणि मुळ स्मारकांच्या आणि म्युरलच्या संशोधनाचे निष्कर्ष अंतर्भूत होते. ते या निष्कर्षाप्रत आले की जरी अर्मेनियन आणि बायझन्टाईन चर्च मध्ये वाद असला तरी ५ व्या ते ७ व्या शतकातील बऱ्याच अर्मेनियन चर्चमध्ये म्युरल होती (उदा. लंपादवान, मरेन, अरुच, तालिन, कोश, येघवार्त इ.) आणि हिच परंपरा पुढील शतकांत चालू राहिली (उदा. तातेव, अख्तामार, हाघबाद, होरोमोस, अनी मधील सुर्प पर्गीच (पवित्र सेव्हीयर), दादीवांक, गेघार्त इ.)
काल्सेडॉन म्युरल १३ व्या शतकात, विशेष करून अर्मेनियन झकरयान सरदार जे जॉर्जियन राज्यात मोठ्या अधिकाराच्या पदांवर होते त्यांच्या प्रदेशातील चर्च आणि मठांमध्ये उदयाला आली आणि सहाजिकच ती काल्सेडॉन तत्वप्रणालीत परिवर्तीत झाली (उदा. अख्ताला, कोबायर).
तरीही अर्मेनियन काल्सेडॉन चर्च मधील म्युरल १३ व्या शतका पुरतीच मर्यादित होती. नंतरच्या काळात अर्मेनियातील आणि अर्मेनिअन विस्थापित प्रदेशातील चर्च मधील भिंती अर्मेनियन म्युरलनीच सुशोभित केल्या होत्या (उदा. विशेषकरून सायप्रस, क्रिमिया, नोर त्चुघा (नवीन जोल्फा), तबलिसी, लवोव इ.). अर्मेनियन चर्च आणि मठात अर्मेनियन ललितकलांचा हा प्रकार १७ व्या शतका पर्यंत बहरत गेला (उदा. सुर्प एच्मीयाद्झिन (पवित्र एच्मीयाद्झिन), हिन त्चुघा (जुनं जोल्फा) येथील अमेनापर्गीत्च, अस्दाबाद, अगुलीस, वरागावांक (वारागा मठ), मुघ्नी येथील संत जॉर्ज, मेघरी इ.) आणि आता सुद्धा तो बहरतोय.
या वेबसाईटवरिल प्रतिमा, छायचित्रं, मजकुरा सहित सर्व सामुग्री ArmenianArt.org ला श्रेय देऊन वैयक्तीक, शैक्षणिक, माहितीपर वापरता यईल.